सेंसेक्समध्ये मोठी घसरण तर निफ्टीही घसरली

0

F&O ची मुदत संपण्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारताचील प्रमुख इक्विटी निर्देशांक घसरले असून ते आता जागतिक समकक्षांशी समान झाले आहेत. बँका आणि धातू या क्षेत्रांतील शेअरमध्ये लक्षणीय घट झाल्याने हा परिणाम झाला आहे. या वर्षी भारतातील प्रमुख स्टॉक निर्देशांकातील वाढ,सातत्यपूर्ण लिक्विडिटी आणि व्यापक किरकोळ सहभागामुळे वाढल्याने बाजारातील ओव्हरव्हॅल्युएशनची चिंता वाढली आहे. मॉर्गन स्टॅनलेने भारताला ‘ओव्हरवेट’ या श्रेणीतून ‘इक्वल वेट’ या श्रेणीत टाकलं आहे. संभाव्य अल्प-मुदतीच्या हेडविंड्सच्या पुढे बाजार मजबूत होईल अशी अपेक्षा आहे असंही म्हटलं आहे.

HTML tutorial

गुरुवारी उशीरा ट्रेडिंगमध्ये इक्विटी निर्देशांकांच्या इंट्रा-डे तोटा वाढला आहे. बाजार निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी 50 अंदाजे दोन टक्क्यांच्या खाली ट्रेड करत असताना दिवसाची निचांकी पातळी गाठली आहे.जागतिक बाजारपेठेतील घसरता कल आणि अखंडित विदेशी निधीचा प्रवाह यामुळे बीएसई सेन्सेक्स 1143 अंकांनी घसरला असून ती 60,000 च्या आत पोहोचला आहे तर बेंचमार्क निफ्टी 356 अंकांनी घसरून 17,854 वर पोहोचला आहे.

शेअर बाजारातील परकिय संस्थात्मक गुंतवणूक म्हणजे FII च्या विक्रीमध्ये सातत्याने वाढ झाल्याने बाजार काही प्रमाणात सावरल्याचं दिसून येतंय. निफ्टी निर्देशांक 2.3 टक्क्यांनी खाली घसरल्याने ते धोक्याच्या पातळीवर म्हणजे लाल रंगात होतं. बँक निफ्टी 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरून 40,652 वर स्थिरावला. निफ्टी मेटल इंडेक्स अंदाजे 2 टक्क्यांनी घसरला.

गुरुवारी शेअर मार्केट बंद होताना सेंसेक्स 1158 अंकांनी घसरून 59,984 वर पोहोचलं तर निफ्टी 353.70 अंकांनी घसरुन 17,857 अंकावर पोहोचली आहे.

BSE मध्ये खाजगी क्षेत्रातील बँकिंग बाजारात कोटक बँक, ICICI बँक आणि अॅक्सिस बँक अनुक्रमे 3.23 टक्के, 3.29 टक्के आणि 2.63 टक्क्यांनी घसरले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:24 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here