आर्यन खानला जामीन मिळाल्यासंदर्भात समीर वानखेडेंची ‘नो कमेंट’

0

गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, आर्यन खानला जामीन मिळाल्यासंदर्भात एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:58 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here