चिपळूण : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शुक्रवारी (दि.२९) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते संगमेश्वर येथे कुणबी भवनाची पायाभरणी होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले मुंबई येथून जनशताब्दी एक्स्प्रेसने चिपळुणात येणार असून सकाळी ९:३० वा. चिपळूण येथे त्यांची पत्रकार परिषद व कार्यकत्यांची बैठक होणार आहे. यावेळी ते काँग्रेस संघटनेचा चिपळूण तालुका व शहर असा आढावा घेतील. आगामी नगर परिषद, जि.प., पं. स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी व चिपळूण न.प.ची तयारी या अनुषंगाने ते कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहर अध्यक्ष लियाकत शाह आदी उपस्थित राहाणार आहेत. यानंतर पटोले हे कुणबी भवन पायाभरणी समारंभास उपस्थित राहतील. सकाळी ११:३० वा. हा कार्यक्रम होईल. दुपारी संगमेश्वरहून ते लांजाकडे प्रयाण करतील. सायंकाळी लांजा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होईल. सायंकाळी ६ वा. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी. यानंतर साखरपा येथे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतील.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 29-Oct-21
