‘आमची पण तारीख ठरलेय…!’ : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील राष्ट्रवादी, भाजपचे कार्यकर्ते, नेते व लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ‘आमची पण तारीख ठरलेय’ असा सूचक इशारा शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी व भाजपला दिला आहे. मिशन युवा स्वास्थ्य अभियानाच्या शुभारंभासाठी ना. सामंत रत्नागिरीत आले होते. यावेळी नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येणाऱ्या निवडणुका स्वबळावर की आघाडी करून लढायच्या हे पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. मात्र, पक्ष वाढवायला कोणत्याही अटी-शर्ती नाहीत. राज्यातील प्रत्येक भागात प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपापले काम करीत आहे. शिवसेनेतही राष्ट्रवादी, भाजपमधील लोकप्रतिनिधी, नेते प्रवेश करणार आहेत. येत्या काही दिवसांत कोकणातील तीनही जिल्ह्यांत आपण राजकीय धमाका करणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. तर दि. १६ नोव्हेंबरला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here