आर्यन खानला अखेर जामीन, आज कारागृहातून सुटकेची शक्यता

0

◼️ अटींची पूर्तता न केल्यास जामीन रद्द होणार

HTML tutorial

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खान ची अखेर गुरुवारी 25 दिवसांनी जामीनावर सुटका झाली. परंतु, निकालाची प्रत आज मिळणार असल्यानं आर्यनला जामीन मिळाल्यानंतरही आणखी एक रात्र तुरुंगातच काढावी लागली. आर्यन खान आज तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात काल (गुरुवारी) पार पडलेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू माजी अटॉर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी मांडली. तर एनसीबीच्या वतीनंही जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अखेर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन मंजूर करण्यात आला

जामीन देण्यासोबतच उच्च न्यायालयानं आर्यन खानला काही अटीं आणि नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. अटींनुसार, उच्च न्यायालयानं आर्यन खान ला इतर कोणत्याही आरोपीसोबत संपर्क साधता येणार नाही. याव्यतिरिक्त स्पेशल कोर्टाच्या कारवाईला कोणत्याही प्रकारे अडथळे निर्माण होतील, असं काहीही आर्यन खाननं करु नये. तसेच जामीन अर्ज मंजूर करताना उच्च न्यायालयानं आर्यन खानला आपला पासपोर्ट स्पेशल कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान, म्हटलं गेलं की, आर्यन खान उच्च न्यायालयानंच्या परवानगीशिवाय देश सोडू शकत नाही. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, आर्यन खान जर मुंबईतूनही बाहेर जाणार असेल तर याबाबतची माहिती त्यानं या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांना आधीच देणं आवश्यक आहे. या दरम्यान, उच्च न्यायालयानं हेदेखील म्हटलं की, जर आर्यन खाननं अटी मान्य करुन त्यांचं पालन केलं नाही, तर मात्र त्याचा जामीन रद्द होऊ शकतो.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:13 AM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here