‘उपर’चे वारे सध्याच्या मत्स्य हंगामासाठी पर्वणी

0

रत्नागिरी : समुद्रात जोरदार वाहणारे उपरचे (उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे) वारे सध्याच्या मत्स्य हंगामासाठी पर्वणी ठरत आहेत. हंगामाच्या प्रारंभीच मच्छीमारांच्या जाळ्यात पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा, सरंगा आदी चविष्ट मासे सापडत असल्यामुळे यंदाचा मासेमारी हंगाम जोर धरू लागला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर गिलनेट , न्हय , रापण , घरकडी ट्रॉलिंग , फिशिंग अशा विविध प्रकारची मासेमारी करण्यात येते . पावसाळ्यानंतर काही दिवस समुद्रातील बदलत्या वातावरणामुळे मासेमारी हंगाम थंडावला होता . यावेळी मच्छीमारही चिंतेत होते. मात्र, आता मच्छीमारांच्या जाळ्यात बऱ्यापैकी मासळी मिळत असल्याने मच्छीमार सुखावला आहे . सद्यस्थितीत गिलनेटधारक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात बांगडा मासा मिळत आहे. पारंपरिक मच्छीमारांकडून आलेल्या बांगड्याला सुरुवातीला टोपलीमागे ६०० रुपये दर प्राप्त झाला होता. मात्र जसजशी बांगड्याची आवक वाढत गेली तसा बांगड्याचा दर घसल्याची स्थिती होती. पापलेटला लहान मोठ्या आकारानुसार दर मिळत होता . बारीक पापलेटच्या टोपली मागे २०२१ ते २५०० इतका दर होता . तर मोठ्या पापलेटला टोपलीमागे ३००० ते ३५०० रुपये दर मिळाला छोटी सनाकी प्रति टोपली १२०० रुपयांना खरेदी केली गेली. मोरीचा दर प्रतिकिलो २८० ते २९० एवढा होत पांढऱ्या कोलंबीचा भाव प्रति किलो ३०० रुपये होता यंदा देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वच राज्याम बांगड्याचे उत्पादन होत आहे . बांगड्याची मोठ्या आवक होत आहे. दोन दिवसांपूर्वी मालवणात स्था मच्छीमारांना बंपर बांगडा मासा आढळून आला होता. बांगड्याला भाव कमी मिळाल्याने मच्छीमार नाराज होते. मात्र, मासळी खारविणे व सुकविणाऱ्या व्याप उत्तम प्रतिसाद दिल्याने मच्छीमारांच्या श्रमाला थोडे यश मिळाले. मालवण बंदरात आता चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असल्याने मत्स्यखवय्ये देखील सुखावले आहेत. जोर धरू लागला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर गिलनेट, न्हय, रापण, घरकडी ट्रॉलिंग, फिशिंग अशा विविध प्रकारची मासेमारी करण्यात येते. पावसाळ्यानंतर काही दिवस समुद्रातील बदलत्या वातावरणामुळे मासेमारी हंगाम थंडावला होता. यावेळी मच्छीमारही चिंतेत होते. मात्र, आता मच्छीमारांच्या जाळ्यात बऱ्यापैकी मासळी मिळत असल्याने मच्छीमार सुखावला आहे . सद्यस्थितीत गिलनेटधारक मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात बांगडा मासा मिळत आहे . पारंपरिक मच्छीमारांकडून आलेल्या बांगड्याला सुरुवातीला टोपलीमागे ६०० रुपये दर प्राप्त झाला होता . मात्र जसजशी बांगड्याची आवक वाढत गेली तसा बांगड्याचा दर घसल्याची स्थिती होती. पापलेटला लहान मोठ्या आकारानुसार दर मिळत होता. बारीक पापलेटच्या टोपली मागे २०२१ ते २५०० इतका दर होता. तर मोठ्या पापलेटला टोपलीमागे ३००० ते ३५०० रुपये दर मिळाला. छोटी सनाकी प्रति टोपली १२०० रुपयांना खरेदी केली गेली. मोरीचा दर प्रतिकिलो२८० ते २९० एवढा होता. पांढऱ्या कोलंबीचा भाव प्रति किलो ३०० रुपये होता. यंदा देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वच राज्यामध्ये बांगड्याचे उत्पादन होत आहे. बांगड्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. दोन दिवसांपूर्वी मालवणात स्थानिक मच्छीमारांना बंपर बांगडा मासा आढळून आला होता . बांगड्याला भाव कमी मिळाल्याने मच्छीमार नाराज झाले होते. मात्र, मासळी खारविणे व सुकविणाऱ्या व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने मच्छीमारांच्या श्रमाला थोडेफार यश मिळाले. मालवण बंदरात आता चांगल्या प्रकारे मासे उपलब्ध होत असल्याने मत्स्यखवय्ये देखील सुखावले आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here