जामीन मिळाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया; तुरुंगातील कर्मचाऱ्यांना म्हणाला…

0

ड्रग्ज प्रकरणी गेल्या २५ दिवसांपासून एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर गुरुवारी (२८ ऑक्टोबर) जामीन मिळाला. त्याच्यासोबत ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात आर्यनच्या जामिनावर युक्तिवाद सुरू होता. अखेर त्याला जामीन मिळाला आहे. आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर खान कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. यामध्येच आता आर्यनने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तुरुंग प्रशासनाच्या माहितीनुसार, आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर ही गोष्ट त्याला संध्याकाळी ६ वाजता सांगण्यात आली. तुरुंगातील कर्मचारी संध्याकाळी त्याला जेवण द्यायला गेले होते. त्यावेळी त्यांनी आर्यनच्या जामिनाची माहिती त्याला दिली. विशेष म्हणजे ही माहिती मिळाल्यानंतरही त्याने तुरुंगातील जेवणाला हात न लावल्याचं सांगण्यात येतं. संध्याकाळी सहाच्या सुमारास तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी कैद्यांना रात्रीचं जेवण दिलं. यावेळी ते आर्यनच्या कोठडीतही गेले होते. आर्यनला जेवण देत या कर्मचाऱ्यांनी त्याला जामीन मंजूर झाल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे जामीन मिळाल्याचं समजताच आर्यनने उपस्थित कर्मचाऱ्यांचे आभार मानले. thank you असं म्हणत आर्यनच्या चेहऱ्यावर हसू पसरलं, असं तुरुंगातील प्रशासनाने सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here