रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन १ नोव्हेंबर रोजी होणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची २८ ऑक्टोबर रोजी तारीख न मिळाल्याने या दिवशी भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. नगरविकास मंत्र्यांची आता १ नोव्हेंबर ही तारीख मिळाली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची अंदाजपत्रकीय रक्कम १७ कोटी इतकी झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेने आपल्याच कार्यकाळात या इमारतीचे भूमिपूजन व्हावे यासाठी कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्या मदतीने सर्व प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश येऊन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला काम मिळाले फेर निविदा प्रक्रिया केल्यानंतर या कंपनीला ठेका मिळाला आहे. नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीतच भूमिपूजन सोहळा व्हावा यासाठी ना. सामंत यांनी साकडे घालण्यात आले. त्यानुसार २८ ऑक्टोबर ही तारखेला नगरविकास मंत्री येतील, अशी अपेक्षा होती; परंतु ही तारीख न मिळाल्याने भूमिपूजन कार्यक्रमाचे नियोजन पुढे ढकलावे लागले. १ नोव्हेंबर ही तारीख जवळ जवळ निश्चित झाली असून त्य पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रदीप साळवी शिवसेनेचे गटनेते राजन शेट्ये आणि अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे, तेथील पाहणी केली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 29-Oct-21
