Breaking : ३४० जणांची फसवणूक करणाऱ्या रत्नागिरीतील बिल्डरला पनवेल मधून अटक

0

रत्नागिरी :* रत्नागिरीतील धामणसे, निवेंडी येथे बांधकाम प्रकल्पाची घोषणा करून गुंतवणूकदारांची १४ कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या महेश नवाथे या रत्नागिरीतील बांधकाम व्यवसायिकाला रत्नागिरी शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने केली. एकूण ३४० तक्रारी त्याच्याविरोधात दाखल आहेत. २०१६ साली आर्थिक गुन्हे शाखेने त्याला मुंबई येथे अटक केली होती. यानंतर पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. अनेक गुंतवणूकदारांनी ग्राहक मंचाकडे देखील त्याच्या विरोधात दाद मागितली होती. मात्र नायालयाच्या कोणत्याच तारखांना उपस्थित न राहता तो पोलिसांना देखील अनेक वर्ष गुंगारा देत होता. मात्र काल शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या टीमने या बिल्डरला मोठ्या शिताफीने पनवेल येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:19 PM 29/Oct/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here