रत्नागिरी : पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे आंबा घाटातून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. यामुळे या वाहनांना रत्नागिरीत येण्यासाठी मोठा वळसा मारावा लागत होता. याबाबत विविध वाहतूक संघटनांनी हा घात लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली होती. आज पालकमंत्री अनिल परब आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत या घाटातून सहा चाकी २० टनांपर्यंत वाहतुकीस परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याकडे वाहतूकदारांचे लक्ष लागले आहे. आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री अनिल परब, ना. उदय सामंत, खा. विनायक राऊत यांनी सबंधित खात्याशी चर्चा करून त्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. यामूळे शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेच्या मागणीला यश आले आहे.आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीस संबंधित खात्याचे सर्व अधिकारी तसेच आमदार राजनजी साळवी,आमदार योगेशजी कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख विलासजी चाळके साहेब,माजी आमदार सुभाष बने,जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव,माजी अध्यक्ष रोहन बने सभापती माने, लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव,साखरपा शिवसेनेचे बापू शिंदे , योगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.मा.उदयजी सामंत व खासदार विनायक राऊत यानी आंबा घाट मार्गे किमान सहा चाकी वाहतूक सुरु करण्यात यावी, यासाठी विशेष आग्रह धरला .या विषयाचा योग्य पाठ पुरावा करुन घाट सुरु केल्या बद्दल संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव यानी सर्व शिवसेना नेत्यांचे आभार व्यक्त केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
01:18 PM 29/Oct/2021
