‘…त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही’; नवाब मलिकांचा इशारा

0

“भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे कालपासून समीर वानखेडे यांची भेट घेत आहेत. येत्या हिवाळी अधिवेशनामघ्ये मी त्या नेत्यांची नावं जाहीर करणार आहे. त्यानंतर या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणं मुश्किल होणार आहे,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेदरम्यान हा दावा केला. “महिन्याभरापूर्वी परिस्थिती निराळी होती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हँड हे वानखेडेंची भेट घेत आहेत. काशिफ खान याला अटक केल्यानंतर अनेकांची पोलखोल होईल. त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहेत हे उघड होईल. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन वादळी होईल,” असंही मलिक म्हणाले. अधिवेशनामध्ये माझ्या नावाने हल्लाबोल होईल , मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल, विषयांतर करावं म्हणूनही प्रयत्न होईल. परंतु मी कोणाचं नाव घेऊन विषयांतर करणार नाही. मोठी नावं अधिवेशनादरम्यान जाहीर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ड्ग्स पार्टीतील दाढीवाला सेक्स रॅकेट, ड्रग्ज रॅकेट चालवत आहे. त्याला अटक केली गेली नाही, ज्यानं पार्टीचं आयोजन केलं त्याला कसं सोडून दिलं जाऊ शकतं? पार्टीला आलेल्या १३०० लोकांचा तपास का झाला नाही, असा सवालही त्यांनी केला.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here