राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये आता मुलींनाही प्रवेश दिला जाणार : मनोज नरवणे

0

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये आता मुलींना पण प्रवेश दिला जाणार आहे, त्यांचं निपक्षपणे स्वागत करा, मुलांप्रमाणेच मुलींनाही प्रबोधिनी मध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केले आहे.

पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४१ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे हे उपस्थित होते. यावेळी एनडीएचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्त्री, दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जय सिंह नैन, आदी उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भावामुळे दीड वर्षानंतर दीक्षांत संचालन सोहळा दिमाखात पार पडला. त्यामुळे प्रबोधिनीचे छात्र पण उत्साहात होते. प्रबोधिनीच्या ध्वज समारंभ पूर्वक मैदानात आणण्यात आला. आणि उपस्थितांनी उभे राहून ध्वजाच स्वागत केले.

HTML tutorial

”कदम कदम बाढाये जा”, या बँडच्या धूनवर दिमाखदार संचलनाला सुरूवात झाली. संचलनाला चेतक हेलिकॉप्टरने सलामी दिली. तालबद्ध संचलन सुरू असताना सुपर दिमोना या विमानांनी हजेरी लावली. प्रबोधिनीचे माजी छात्र असलेले जनरल नरवणे यांनी संचलानाची पाहणी केली. यानंतर १४१ व्या तुकडीचे छात्र अंतिम पथा कडे तालबद्ध पाऊल टाकत मार्गस्थ झाले. अंतिम पथाचा टप्पा पार केल्यानंतर छात्रांनी एकच जल्लोष केला आणि या जल्लोषात जग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांना सलामी दिली. कोव्हीड नियम शिथिल करण्यात आल्याने यंदा छात्रांच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:43 PM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here