मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणात मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर, समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावाच मलिक यांनी केला. तसेच, समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे कागदपत्रही त्यांनी सोशल मीडियात शेअर केले होते. त्यावरुन, मलिक विरुद्ध वानखेडे संघर्ष सुरू आहे. त्यात, आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी उडी घेत समीर यांच्या पाठिशी असल्याचं म्हटलंय. समीर वानखेडे दलित कुटुंबातील आहेत, त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातयं. मात्र, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या पाठिशी आहे, असे म्हणत समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत, म्हणूनच ड्रग्जप्रकरणातील आरोपींना त्यांनी पकडल्याचं केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. तसेच, समीर वानखेडे हे दलित समाजाचे आहेत, त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. पण, नवाब मलिक म्हणतात, त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे. दाऊद तर तिकडं पाकिस्तानात आहे, मग इथं कसा येऊ शकतो, असा प्रतिप्रश्न केला. नवाब मलिक समीर वानखेडेंच्या पाठीमागे लागले आहेत, आता आम्ही मलिकांच्या मागे लागू असे म्हणत समीर यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेवच असल्याचेही आठवलेंनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:24 PM 29-Oct-21
