सामनातील नाणारसंदर्भातील जाहिरातीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या पहिल्या पानावर नाणारची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘शिवसेनेचे धोरण आणि निर्णय मी ठरवतो. ते ‘सामना’तून मांडले जातात. जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाहीत, हे मी नमूद करु इच्छितो. जाहिरात आली म्हणजे शिवसेना बदलली असं होत नाही. त्यामुळे ‘नाणार नाही होणार’ अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
