रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला आज नामदार जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी वाचनालयातील ग्रंथसंपदे ची प्रत्यक्ष पाहणी नामदार पाटील यांनी केली. तसेच जुनी ग्रंथसंपदा आवर्जून मागून घेतली व त्यातील काही पुस्तके त्यांनी चाळली. वाचनालयाच्या अन्य उपक्रमांची आस्थेने माहिती घेतली. हे वाचनालय इतके सुसज्ज आहे व ग्रंथसंपदेने परिपूर्ण आहे ही रत्नागिरी साठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी देणगी आहे.असे भावोद्गार ना. पाटील यांनी काढले. या वाचनालयाला आज अवचितपणे भेट देता आली आणि या वाचनालयाचे संपन्न ग्रंथदालन पाहता आले याचा मनस्वी आनंद वाटतो. इतके जुने वाचनालय तरीही अद्ययावत मांडणी व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर यामुळे मन सुखावून जाते.असे ना. जयंत पाटील म्हणाले. या वाचनालयाला राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक असणारी सर्व ती मदत तातडीने पुरवू जुन्या ग्रंथसंपदे चे डिजिटलायझेशन करण्याचा प्लॅन तयार करा निधी उभारणीसाठी नक्की मदत करेन. फुरसतीचा वेळ मिळाला तर नक्की या वाचनालयामध्ये परत परत येईन तो पर्यंत वाचनालयाच्या ॲपच्या माध्यमातून पुस्तके शोधून तुमच्याकडे पुस्तकांची मागणी मी आता कायम करणार आहे असेही नामदार पाटील यांनी अँड. दीपक पटवर्धन यांना त्यांनी सांगितले. याप्रसंगी नामदार पाटील यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व एक ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी राव जाधव, मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू सुर्वे तसेच वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर तसेच चंद्रशेखर पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:38 PM 29-Oct-21
