खेड नगर परिषद क्षेत्रात नगरोत्थान निधी योजनेंतर्गत मंजूर कामांचे भूमिपूजन

0

खेड : येथील नगर परिषद क्षेत्रात नगरोत्थान निधी योजनेंतर्गत मंजूर कामांचे नुकतेच नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. खेड पालिका हद्दीत नगरोत्थान निधीअंतर्गत पुढील कामे मंजूर झाली असून त्यांचे भूमिपूजन नुकतेच झाले. या योजनेत मंजूर कामांमध्ये खेड नगर परिषद हद्दीतील संतोष हुमणे यांच्या घरासमोरील संरक्षण भिंत बांधणे. कासार आळी येथे अॅक्टिव्हिटी सेंटर उभारणे. प्रभाग क्र. २ मधील गुलमोहर पार्क येथील रिवा अपार्टमेंटपासून संदेश बुटाला व जावेद परकार यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे. नाना- नानी पार्क सुशोभीकरण करणे. समर्थ, इंद्रप्रस्थ हॉटेल ते अतुल शेठ यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. वामन मोरे, जड्याळवाडी निसार खतीब भारत गॅसपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. गांधी चौक येथे सार्वजनिक शौचालय बांधणे. इब्राहिम डावरे घर ते मैनुद्दीन यांच्या यांच्या घरापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस गटाराचे बांधकाम करणे. जामा मशिद पौत्रिक मोहल्ला इरफान महालदार यांच्या घरापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस गटारांचे बांधकाम करणे. अयाली हदिस मशिदी समोरील गटाराचे बांधकाम करणे. खेड नगर परिषद बिल्डिंग समोरील गटाराचे बांधकाम करणे, अलहसामी पार्क येथून तांबे हाऊस ते मेहबूब महाडीक यांच्या घरापर्यंत गटाराचे बांधकाम करणे. खेडनगर परिषद इमारतीचे मजबुतीकरण करणे,खेडनगर परिषदभाजी मार्केट दुरुस्ती करणे. समर्थनगर कमानी शेजारील भाग सुशोभीकरण करणे, हॉटेल सवेरा (कोष्टी आळी) ते वरदायनी मंदिरापर्यंत व वरवाटकर संकूल ते दळवी हेअर कटिंग सलूनपर्यंत दोन्ही बाजूनी गटार बांधणे, दापोली नाका गणपती घाट दुरुस्ती सुशोभीकरण व बांधकाम करणे. बाजारपेठ पाथरजाई साने जवळील आरक्षित जागेवर अंडपार्कसाठी प्रथम खडीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:44 PM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here