गणपतीपुळे येथील आजच्या कार्यक्रमात आ. भास्कर जाधव यांची नाराजी उघडपणे दिसून आली. सर्वांच्या डोळ्यादेखत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आ. भास्कर जाधव यांनी खा. विनायक राऊत यांचा हात झटकला. खा. विनायक राऊत भास्कर जाधव यांना मुख्यमंत्र्यांच्या सत्कारासाठी जवळ खेचत असताना हा प्रकार घडला. या प्रकारानंतर अनेक चर्चा कानावर ऐकू येऊ लागल्या त्या पुढीलप्रमाणे:
चर्चा नं १) भास्कर जाधव हे माजी कॅिबनेट मंत्री यानुसार शासकीय राज शिष्ठाचारानुसार त्यांची व्यासपीठावरील जागा हि किमान खा. विनायक राऊत यांच्या शेजारी तरी असायला हवी होती. मात्र शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे हि जागा गेल्याने आ. भास्कर जाधव नाराज झाले व त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांची व्यासपीठावरच हजेरी घेतली असे बोलले जात आहे
चर्चा नं २) रत्नागिरी जिल्ह्याची आढावा बैठक सिंधुदुर्गात का ? हा प्रश्न उपस्थित करताच खा. विनायक राऊत यांनी सांगितले कि आता ठरलंय तसचं होईल आता बदल नाही यामुळे भास्कर जाधावानाचा पारा चढला व त्यांनी खा. विनायक राऊत यांचा हात झटकला
चर्चा नं ३) आपले पूर्वीचे प्रतिस्पर्धी ना. उदय सामंत यांच्यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वास टाकून दिलेले मंत्रिपद यामुळे भास्कर जाधव पूर्वीपासूनच नाराज होते व त्या नाराजीचा उद्रेक आज व्यासपीठावर झाला.
चर्चा अनेक होत असतात मात्र या तीनही चर्चा खात्रीशीर आहेत असा ठाम विश्वास देखील काही राजकीय नेत्यांनी व्यक्त केला आहे. मात्र याबाबतचे स्पष्टीकरण अजूनही कुणाकडून उपलब्ध नाही.
