रत्नागिरी : सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरी या संस्थेच्यावतीने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही दिवाळीचे औचित्य साधून विविध प्रकारच्या वस्तू, हाती तयार केलेले दागिने, सारस्वतीय मत्स्याहारीन जेवण तसेच शाकाहारी खाद्य पदार्थ, कपडे, मसाले. विविध प्रकारची लोणची, दिवाळी फराळ आदी विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑक्टोबर ते मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत यशोधन अपार्टमेंट, अभ्युदय नगर, चैत्रबन सोसायटीसमोर, नाचणे रस्ता, रत्नागिरी या ठिकाणी मागील वर्षीप्रमाणे विक्री प्रदर्शन भरविण्यात येत आहे. दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता स्टॉलचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक अण्णा सामंत यांच्याहस्ते व किरण तथा भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील उद्योजक सुनील भोंगले, दीपक जाधव, यशोधन आणि इतर संस्थेतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोविड-१९ च्या प्रादर्भावाचा विचार करता शासकीय नियमांचे पालन करून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील चोखंदळ ग्राहकांना या ठिकाणी एकाच छत्राखाली आपल्या आवडीनिवडीनुसार मनसोक्त खरेदी करता येणार आहे. मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही शहरातील सर्व नागरिकांनी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सारस्वत स्नेहवर्धक मंडळ, रत्नागिरी या संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:03 AM 30-Oct-21
