जिल्ह्यातील अपूर्ण धरणांसाठी १४०० कोटींची गरज : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

0

रत्नागिरी : जिल्ह्यात सहा धरणांचे काम पुर्ण झाले आहे. तरी त्यांची काही कामे अपूर्ण आहेत. त्या कामासाठी सुमारे १४०० कोटी रुपयांची गरज आहे. लवकरच त्यासाठी निधीची तरतुद केली जाईल. अन्य सहा धरण प्रकल्पांचे काम ठप्प आहे. त्यांची सुधारित मान्यता घेऊन त्यांना मान्यता घेतली जाणार आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सिंचन वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी जलसंधारण विभागाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील धरणांच्या कामांची स्थिस्ती, अपुर्ण धरणे, धोकादायक धरणे आदीबाबत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यान पाण्याचा मुबलक साठा होतो. मात्र सिंचनासाठीचा वापर अतिशय नगन्य आहे. तो वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात किडे, शिरसवाडी, चिंचळवाडी, भोळवशी, या धरण प्रकल्पांची कामे पुर्ण झाली आहे. त्यांना अविष्टीत प्रकल्प म्हणतात. मात्र तरी त्याची अनेक कामे अपूर्ण आहे. ही कामे पुर्ण करण्यासाठी १४०० कोटींची गरज आहे. तसा अहवाल पाटबंधारे विभागाने दिला आहे. हे धरण प्रकल्प १०० टक्के पुर्ण करण्यासाठी लवकरच अपेक्षीत निधीची तरतुद केली जाईल. जिल्ह्यातील अन्य सहा धरणांचे काम अनेक वर्षांपासून ठप्प आहे. त्या धरणांच्या कामाला गति मिळावी किंवा त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सहा प्रकल्पांना सुधारित मान्यता घेतली जाणार आहे. तसे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहेत. काही प्रस्ताव तंत्रज्ञान समितीकडे पाठविण्यात आले आहेत. हे प्रस्तावही लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, असे श्री. पाटील म्हणाले

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here