दापोली : राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करेक्ट कार्यक्रम होत आहे. सेनेतील दिग्गज पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हा करेक्ट कार्यक्रम ना. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडतोय याचा आनंद आहे, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर ना. जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मेहबूब शेख, आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, अजय बिरवटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दि.२८ रोजी दापोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रा आणि पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी खा. तटकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख संदीप राजपुरे, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे, खेडचे तालुकाप्रमुख दत्ताराम गोठल, युवासेना तालुका अधिकारी विकास जाधव, साखळोली ग्रामपंचायत सरपंच मधुकर भुवड आदी शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:36 AM 30-Oct-21
