देवरूख आगारातर्फे महाबळेश्वरच्या पर्यटनासाठी विशेष फेरी

0

देवरूख : शहरातील एसटी आगाराच्या वतीने पर्यटन विशेष बस सुरू केली जाणार आहे. ही सेवा महाबळेश्वर या ठिकाणी एक दिवसाची दिली जाणार आहे. याच महिन्याच्या ३१ तारखेपासून ही सेवा सुरू केल्यावर महिन्याच्या दुसरा व चौथ्या रविवारीच सेवा दिली जाणार आहे. प्रवासी वर्गाच्या मागणीनुसार, सुट्टीच्या दिवशी ग्रुप बुकिंग केले जाणार आहे. यात महाबळेश्वर येथील ऑर्थरपाईंट, एलिफंट पॉईंट, सावित्री, वेण्णा लेक, पाचगणी, मेप्रो गार्डन, सनसेट असे पॉईंट दाखवले जाणार आहेत. ही बस फेरी आगारातून सकाळी ६.३० वा सुटून पुन्हा रात्री ११ वा. परत येईल. एका प्रवासाला यासाठी ६८५ रु. खर्च येणार आहे. या फेरीचा लाभ प्रवासीवर्गाने घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक सागर गाडे यांनी केले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here