आता शेतकऱ्यांना देखील मिळणार दिवाळीचा बोनस

0

रत्नागिरी : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांना देण्यात येणारा निधी आता दुप्पट करण्यात येणार आहे. ऐन दिवाळीत या निधीत दुपटीने केलेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनसच ठरणार आहे. या योजनेत देण्यात येणारा दोन हजारांचा हप्ता आता दुप्पट म्हणजेच चार हजार रुपये होणार आहे. कंपन्या आपल्या कामगारांना खूश करण्यासाठी व दिवाळीचे गिफ्ट म्हणून आपल्या कामगारांना बोनस देऊ करतात; पण शेतकरी राजाला खूश करण्याचा, त्याला आनंद देण्याचा कुणीच विचार करत नाही. आता शेतकऱ्यांना देखील दिवाळीचा बोनस मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात; पण आता ही रक्कम दुप्पट करण्याचा सरकार विचार करत आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, सरकार पीएम किसान सन्मान निधीची रक्कम दुप्पट म्हणजेच १२०००
रुपये करणार आहेत. शेतकऱ्यांना जो हप्ता पूर्वी २००० चा मिळत होता तो वाढून आता ४००० रुपये होईल. म्हणजे जे २००० चे आधी तीन हप्ते मिळत होते ते आता ४००० चे तीन मिळतील. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता हा डिसेंबरमध्ये येणार, असे सांगितले जात आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दहावा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:50 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here