नितीन गडकरींमुळे मला आमदारकी मिळाली, सरकार असताना जे मिळालं ते अमित शाह यांच्यामुळे : चंद्रकांत पाटील

0

HTML tutorial

राजकीय जीवनात आमदारकी मिळाली ती नितीन गडकरी यांच्यामुळे मिळाली असल्याचं वक्तव्य माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील केलं. “जावडेकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील परंपरागत जागा गेली ती तुमच्या जनसंपर्कामुळे खेचून आणू शकता असं म्हणत त्यांनी थेट घोड्यावरच बसवलं. त्यावेळी निवडणूक हा विषयदेखील कळत नव्हता,” असा किस्सा पाटील यांनी सांगितला. ते एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचादेखील आपल्या राजकीय जीवनात मोलाचा वाटा असल्याचं पाटील यांनी सांगितलं. “कर्तृत्व हा भाग बाजूला केला तर सरकार असताना मला जे काही मिळालं ते अमित शाह यांच्यामुळेच मिळालं आहे. याबाबत आपल्या मनात तिळमात्र शंकाही नाही,” असं ते म्हणाले. विधान परिषदेचा नेता कोण व्हावा याबाबत अमित शाह यांच्या मनात कोणताही संदेह नव्हता. वरच्या सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटीलच बनतील असं अमित शाह यांनी सहजरित्या देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनाही त्यात काही समस्या नव्हतीच. २०१४ ते २०१९ या कालावधीत मला जे काही मिळालं त्यासाठी जी एक साथ आवश्यक होती ती देखील अमित शाह यांनी दिल्याचे ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:27 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here