रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक तरुण नेतृत्वांकडून होणाऱ्या चांगल्या कामांची दखल घेत वरिष्ठ नेत्यांकडून अतिरिक्त कार्यभार सोपवला जात आहे. आता रोजगार विभागाचे जिल्हा संघटक रूपेश जाधव यांच्यावर मनसेप्रणित मराठी कामगार सेनेचे जिल्हा संघटक पद सोपवण्यात आले आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गुरूप्रसाद चव्हाण यांच्याकडे माथाडी कामगार सेनेच्या चिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध विभागाच्या तरूण पदाधिकाऱ्यांकडून पक्षाची बांधणी केली जात आहे. यासाठी राज्याचे चिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, कामगार सेनेचे जिल्हा चिटणीस सुनील साळवींसह इतर पदाधिकाऱ्यांची मदत होत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:54 PM 30-Oct-21
