दापोली : दापोली नगरपंचायत कार्यक्षेत्रात आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून बोगस मतदार नोंदणी सुरू आहे. ही नोंदणी थांबविण्यात यावी आणि बोगस नोंदणी झाली आहे, अशांची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी युवा सेनेचे नेते ऋषिकेश गुजर यांनी दापोली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दापोली तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात गुजर यांनी म्हटले आहे की, दापोली नगरपंचायतीची निवडणूक येत्या दोन महिन्यांत होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगामार्फत नवीन मतदार नोंदणी चालू आहे. त्यामध्ये वॉर्ड क. ३,४,५ या वॉर्डमध्ये मतदारांनी नावे नोंदणीसाठी अर्ज केलेले आहेत. वास्तविक पाहता सर्व नवीन मतदार हे आजूबाजूच्या खेडेगावांमधील आहेत. नावे नोंदवताना बँक पासबुक हा एकमेव पुरावा घेतल्याचे दिसून येत आहे. नगर पंचायतीचे बीएलओ यांनी प्रत्यक्षात खात्री न करता केवळ अॅपच्या आधारे कोणाच्या तरी सांगण्यावरून नावे नोंदविल्याचे दिसून येत आहे. रहिवासी असल्याचे खोटे पुरावे देखील काहींनी सादर केले आहेत. वरील सर्व कागदपत्रांची व प्रत्यक्षात राहत असलेल्या जागेची पाहणी करणे गरजेचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:04 PM 30-Oct-21
