दापोली : दापोली तालुक्यातील मुगीज ठोंबरेवाडी येथे एका महिलेने आपल्या अपरोक्ष खैराची झाडे तोडून नेऊन त्याची रक्कम मागितली असता असभ्य वर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश करावडे याने २६ सप्टेंबर रोजी फिर्यादी महिलेच्या मालकीची खैराची झाडे तोडली. ही फिर्यादी महिला ठाणे येथे सध्या राहात असून मामा आजारी असल्याने त्यांना पाहण्याकरिता दापोली येथे आल्या होत्या. त्या वेळी त्यांना झाडे तोडलेली असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गावातील सदस्य व पोलिस पाटील यांच्यासोबत दि. ४ ऑक्टोबर रोजी सभा आयोजित केली. यावेळी सभेत राजेश करावडे यांनी खैराचे पैसे आणून देतो, असे बैठकीदरम्यान कबूल केले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी महिला सुरेश गुजर यांच्या दुकानात घरगुती साहित्य आणण्याकरिता गेल्या असता राजेश करावडे व सुरेश गुजर यांनी त्या महिलेला दुकानातून बाहेर बोलावले. त्यावेळी करावडे तेथून निघून गेला तर सुरेश गुजर याने अपशब्द बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले व खैराचा एकही रुपया मिळणार नाही, असे सांगितले. महिलेच्या बाबतीत घडलेल्या या प्रकरणी सुरेश गुजर यांच्याविरोधात दापोली पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास दापोली येथील पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल साक्षी गुजर करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:09 PM 30-Oct-21
