जिल्हा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

0

रत्नागिरी : ओबीसींची जातवार जनगणना न करणे, शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द न करण्याच्या विरोधात, वाढती महागाई, गॅस, पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडणाऱ्या दर वाढीविरोधात जिल्हा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चातर्फे सुत्रबद्ध आंदोलनाचा दुसरा टप्प्यात शुकवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ओबीसींच्या संविधानिक हक्काधिकारासाठी केलेल्या आंदोलनात राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ, भारतीय विद्यार्थी मोर्चा, बिन, नफ, छत्रपती, क्रांती सेना, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व राष्ट्रिय किमान मोर्चा रत्नागिरी या सर्व संघटनांचा संयुक्त सहभाग होता. या देशात जनावरांची गणती होते; परंतु स्वातंत्र्यांच्या 74 व्या वर्षात ओबीसींची जातनिहाय जनगणना भारत सरकारने केलेली नाही. ब्रिटीशांनी 1871 ते 1931 पर्यंत सर्व जातींची जनगणना देशातील एससी, एसटी, ओबीसीचा विकास करण्यासाठी आवश्यक आकडेवारी पाप्त करण्यासाठी करण्यात येत होती. या देशात ब्रिटीशांनी ओबीसींची शेवटची जातनिहाय जनगणना 1931 साली केली होती. त्यानुसार या देशात ओबीसींची संख्या 52 टक्के इतकी होती. स्वतंत्र भारतात 1951 मध्ये प्रधानमंत्री जवारलाल नेहरू यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना बंद केली. त्यांनतर सर्वच केंद्र सरकारनी ओबीसींची जातनिहाय जनगणना केली नाही. त्यामुळे ओबीसींची आकडेवारी उपलब्ध नसल्याने ओबीसींच्या विकासाच्या योजना अंमलात आणल्या जात नाहीत. त्यासाठी ओबीसींची जातवार जन गणना न करणे ही पमुख मागणी आहे. त्याचबरोबर इव्हीएम मशिनच्या विरोधात व शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द न करण्याच्या विरोधात, वाढती महागाई, गॅस, पेट्रोल डिझेलच्या गगनाला भिडणाया दर वाढिच्या विरोधात, कंत्राटिकरण, खासगिकरणाच्या विरोधात, आरक्षणाच्या समर्थनार्थ हे आंदोलन या संघटनेने पुकारलेले आहे. त्यासाठी दुसरा टप्प्यात हे धरणे आंदोलन रत्नागिरी राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चा रत्नागिरी जिल्हा संघटनेने केले. त्यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष हरिश्चंद्र फुटक, उपाध्यक्ष रमेश थोरात, चंद्रकांत रेवाळे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव खांबे, अभय आग्रे, महेंद्र वालम, रमेश थोरात, निलेश पिसे, सचिन भाताडे आदींनी केले

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here