पंढरपूरच्या पालखी मार्गाच्या उद्घाटनाची तारीख ठरली, 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालखी मार्गाचं उद्घाटन

0

पंतप्रधान ऑनलाइन उपस्थित राहणार

लाखो वारकरी पायी येणार्‍या संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता पूर्वी उभारलेल्या मंडपात हा कार्यक्रम होणार असून मोदी दिल्ली येथून या कार्यक्रमात सहभागी होतील आणि शुभारंभ करणार आहे. यावेळी नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. कार्तिकी यात्रेच्या गडबडीत वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून पंतप्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्याचा तोडगा काढला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here