देवरूख : तळेकांटे-देवरूख मार्गाचे डांबरीकरण सध्या सुरू आहे. या रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. जून महिन्यापूर्वी झालेल्या मोऱ्या मात्र काही ठिकाणी खचल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी वाहनांना दणका बसत आहे. पांगरी ते तुळसणी व निवे ते कर्ली फाटापर्यंत चार ते पाच मोऱ्या खचल्या आहेत. त्यामुळे या मोऱ्यांवरून जाताना वाहनांना फटका बसत आहे. वाहने वेगात असल्याने या खचलेल्या मोऱ्या लक्षात येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अचानक दणका वाहनधारकांना बसतो. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात खचलेल्या मोऱ्यांच्या ठिकाणी नव्याने डांबरीकरण करणे आवश्यक आहे. सध्या या मोऱ्या बोन ब्रेकर ठरत आहेत
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:48 PM 30-Oct-21
