खेड नगर परिषदेतर्फे गुणवंत कर्मचारी, महिला बचत गट, फ्रंट लाईन्स वर्कर यांचा सत्कार

0

खेड : येथील नगर परिषदेकडून ‘माझी वसुंधरा अभियान’ व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत होम कंपोस्ट खत तयार करणाऱ्या महिला बचत गटांचा व फ्रंट लाईन्स वर्कर, तसेच नगर परिषद सफाई कर्मचारी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. खेड नगरपालिकेतर्फे नुकताच पालिकेच्या सभागृहात गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक भूषण चिखले, नगरसेवक अजय माने, तौसिफ खोत, स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर, वरिष्ठ वसुली लिपिक परशुराम पाथरे, सहायक प्रकल्प अधिकारी नेहा करमरकर उपस्थित होते. या कार्यक्रमात माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला व कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थितांनी हरित शपथ घेतली.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:42 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here