अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय : जयंत पाटील

0

रत्नागिरी : सध्या महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र असा जवळपास 9 हजार किमीपेक्षा जास्त प्रवास या यात्रेनं केला आहे. ही यात्रा कोकणात पोहोचली आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. त्यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय आहे आणि आपल्या मदतीने आम्ही ते करणारच.’, असा आत्मविश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. माणसं आपल्याला सोडून गेली म्हणून हतबल व्हायचे नाही. त्यांना जावून एक टर्म पूर्ण झाली आतापर्यंत आपले नवं संघटन येथे तयार व्हायला हवे होते. त्यामुळे मरगळ झटकून नव्याने पक्षाची बांधणी करा. असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले. तसेच, यावेळी महाराष्ट्रात आपला पक्ष सत्तेत आहे. आपल्याला विकासात्मक कामासाठी जी मदत हवी ती मदत केली जाईल. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या मनात स्थान निर्माण करा. असेही मार्गदर्शनही केले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:00 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here