रत्नागिरी : तब्बल सहा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या मच्छीमारी नौकेचा अद्याप शोध लागला नसल्याने गुहागार तालुक्यातील नागरिक चिंतेत आहेत. या नौकेत सहा जण होते. दरम्यान शोध कार्य मोहिमेत एक मृतदेह सापडला आहे. कालपासून पोलीस, स्थानिक मच्छिमार आणि कोस्ट गार्ड यांच्यावतीने शोधमोहीम सुरु आहे. यामध्ये स्थानिक मच्छिमारांना समुद्रात एक मृतदेह तरंगताना आढळला आहे. जयगड येथे एक मच्छीमारी नौका २६ तारखेस बेपत्ता झाली होती. ही नौका नावेद २ naved-2 अशी ओळखली जाते. ती नासीर हुसैनमियाँ संसारे यांची आहे. या नौकेतून सहा खलाशी मासेमारीसाठी गेले आहेत. परंतु त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला आहे. एखाद्या मोठ्या मालवाहू जाहजाने या बोटीला धडक दिल्याची चर्चा गावात आहे. प्रशासनाने याची माहिती सजमताच स्पीड बोटींच्या सहाय्याने शोध मोहीम राबविण्यास प्रारंभ केला. ही नौका सहा सिलेंडरची असल्याची माहिती प्राप्त झाली असून दगडू तांडेल हे मुख्य चालक आहेत तर गोविंद नाटेकर, दत्ता,सूर्या, अनिल, अमोल असे खलाशी नौकेवर गेले होते. हे सर्व गुहागर तालुक्यातील आहेत.
