नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

0

रत्नागिरी : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
मंगळवार 2 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वाजता रेमंड हेलिपॅड,ठाणे येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व तेथून मोटारीने नगरपरिषद रत्नागिरीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता नगरपरिषद रत्नागिरी येथे आगमन व मंत्रीमहोदयांच्या हस्ते नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम. सकाळी 11.30 वाजता रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासकीय व विविध विकास कामांचा आढावा ( स्थळः समिती सभाग्रह, रत्नागिरी नगरपरिषद, रत्नागिरी) दुपारी 1 .00 वाजता नगरपरिषद रत्नागिरी कार्यालयाकडून मोटारीने रत्नागिरी विमानतळकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने रेमंड हेलिपॅड ठाणे कडे प्रयाण.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here