खेडशी येथील अपघातात वृद्ध जागीच ठार

0

रत्नागिरी : रत्नागिरी हातखंबा मार्गावर खेडशी येथील चांदसूर्या पॉईंट जवळ झालेल्या ट्रेलर व दुचाकीच्या अपघातात प्रकाश दत्तात्रय पालकर या ६० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी ३.३० च्या सुमारास घडला. दुचाकी चालक प्रथमेश प्रकाश पालकर वय २५ हा आपले वडील प्रकाश दत्तात्रय पालकर वय ६० राहणार शिरगाव आडी यांना घेऊन आंजणारी येथे चालला होता. खेडशी चांदसूर्या पॉईंट जवळ एका ट्रेलरला ओव्हरटेक करत असताना समोरून आलेले वाहन पाहून घाबरल्याने वडिलांचा तोल गेला व दोघेही गाडीवरून खाली पडले. याचवेळी प्रकाश दत्तात्रय पालकर यांचे डोके ट्रेलरच्या मागील चाकाखाली जाऊन डोक्याचा चेंदामेंदा झाला व ते जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता कि रस्त्यावर मेंदूचे तुकडे व रक्त पसरले होते. मुलगा प्रथमेश हा देखील या अपघातात किरकोळ जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here