रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन २ नोव्हेंबर रोजी

0

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन दि. २ नोव्हेंबर रोजी निश्चित झाले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या भूमिपूजन सोहळ्यास येणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी सांगितले. दरम्यान, रत्नागिरी नगर परिषदेच्या सध्याच्या प्रशासकीय इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ही इमारत नव्याने बांधण्यात येणार आहे. नूतन प्रशासकीय इमारतीचा ठेका निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाल्यानंतर भूमिपूजन कार्यक्रमाची धावपळ सुरू झाली. प्रथम २८ ऑक्टोबर नंतर १ नोव्हेंबर अशा तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार तयारीचे नियोजनही करण्यात आले; परंतु या दोन तारखा नगरविकास मंत्र्यांच्या
इतर कार्यक्रमांमुळे पुढे ढकलल्या गेल्या. आता २ नोव्हेंबर ही तारीख निश्चित असून या दिवशी नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. ‘रनप’ची सध्याची प्रशासकीय इमारत धोकादायक बनली आहे. त्यामुळे नवीन इमारतीची संकल्पना पुढे आली. त्यानुसार आराखडा बनवून १४ कोटी २८ लाख ५४ हजार ८७ रुपयांचे अंदाजपत्रक बनविण्यात आले. हे अंदाजपत्रक २०१९ मध्ये बनविण्यात आल्याने राज्यसूचीनुसार साहित्याची दरवाढ झाली. ही दरवाढ अपेक्षित धरून९.६५ टक्के म्हणजे १ कोटी ३७ लाख ८५४ रुपयांचे वाढीव अंदाजपत्रक असलेली निविदारनपच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केली. सत्ताधारी शिवसेनेने या इमारतीचा भूमिपूजन सोहळा लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न केले

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here