जिल्ह्यात रविवारी सापडले केवळ ९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

0

रत्नागिरी : रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे ९ रुग्ण आढळले, तर १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४७२ आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२०, खेड २२६, गुहागर १७२, चिपळूण ४७६, संगमेश्वर २१९, रत्नागिरी ८२५, लांजा १३०, राजापूर १६५. (एकूण २४७२). नवे ९ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार ९२६ झाली आहे. रविवारी १४ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार २२९ झाली आहे. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.६६ आहे. जिल्ह्यात आढळलेल्या नव्या ९ करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ५७४ नमुन्यांपैकी ५७० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ६०० नमुन्यांपैकी ५९५ अहवाल निगेटिव्ह, तर ५ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ८ हजार ८२६ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here