राजापूर पोलीस स्थानकातून फरार झालेल्या आरोपीला अटक

0

राजापूर : नाटे पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या संशयित आरोपीने राजापूर पोलीस स्थानकातून पळ काढल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करत पुन्हा या आरोपीला ताब्यात घेतले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नाटेतील पोस्को कायद्याखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीला शनिवारी सकाळी 12.30 च्या सुमारास वैद्यकीय तपासणीसाठी राजापुरात आणण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीपूर्वी त्याला राजापूर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत नजर चुकवून या आरोपीने पळ काढला. आरोपी पळाल्याचे लक्षात येताच पोलिसांची एकच धावपळ उडाली. सोशल मिडीयावर संशयित आरोपीचा फोटो व्हायरल करण्यात आला. तसेच पोलीसांनी शहरात सर्वत्र सर्च मोहिम राबविली तसेच सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली, मात्र आरोपी सापडला नाही. अखेर दुपारनंतर राजापूर शहरापासून सुमारे 15 किलोमीटरवर असलेल्या डोंगर तिठा या ठिकाणी पळालेला आरोपी संशयास्पदरित्या फिरताना काही ग्रामस्थांना आढळून आला. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी डोंगर तिठा येथून संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here