कामथे घाटात केमिकलच्या टँकरला आग

0

चिपळूण : कामथे घाटात केमिकलच्या टँकरला आग लागण्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कामथे धरण परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर ही घटना घडली. गोव्याच्या दिशेने हा केमिकलचा टँकर जात होता. अचानक भर रस्त्यातच या टँकरने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही वेळातच संपूर्ण परिसरात काळ्या धुराचा लोट पसरला. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये घबराट पसरली. या आगीच्या घटनेची खबर मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:53 AM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here