चिपळुणात एम. के. थिएटर्सचा आज शुभारंभ

0

चिपळूण : चिपळूणवासीयांनासाठी ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर येथील प्रतिष्ठित उद्योजक महेंद्रकुमार शर्मा यांनी खरेदी केलेल्या पूर्वीच्या पूजा थिएटरचे आता एम.के. थिएटर्स नावाने नामकरण झाले असून आज सोमवार दि.१ नोव्हेंबरपासून एम. के. थिएटरमध्ये रसिकांना नवं नवीन हिंदी, मराठी चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. महेंद्र शर्मा आणि बंधूनी हे चित्रपटगृह पुन्हा सुरू व्हावे, या करिता विशेष मेहनत घेऊन प्रेक्षकांच्या सेवेत आता एम. के. चित्रपटगृह दाखल होत आहे. सन १२ ते ३,३ ते ६ ते ९ असे दिवसभरात चित्रपट दाखविण्यात येणार आहेत याचे खास आकर्षण म्हणजे अभिनेते अक्षयकुमार यांचा येत्या ५ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभर प्रदर्शित होणारा सूर्यवंशी हा चित्रपट लागणार आहे. सोमवारपासून नव्याने सुरू होणाऱ्या एम. के. थिएटर्सने रसिकांना दिवाळीनिमित्त आनंदाची मेजवानी आणली आहे. सोमवार दि.१ नोव्हेंबर रोजी घरगुती पद्धतीने शर्मा कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये एमके थिएटर्सचे उद्घाटन होणार आहे. येथे सुसज्ज असे कॅन्टीनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मनोरंजनासाठी सांस्कृतिक केंद्र बंद असताना आता चित्रपटगृह सुरू होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here