रत्नागिरीत इंधन दरवाढीविरोधात भव्य सायकल रॅली काढून युवा सेनेतर्फे केंद्र सरकारचा निषेध

0

रत्नागिरी : देशभरात पेट्रोल, डिझेलचे भाव शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. त्याचे परिणाम सामान्यांना कसे सहन करावे लागत आहेत, हे दाखवून देण्यासाठी रत्नागिरीत केंद्र शासनाच्या निषेधार्थ युवा सेनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. पर्यावरणमंत्री आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार रविवार, दि. दि. ३१ रोजी केंद्र शासनाच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून रत्नागिरीत भव्य रॅली काढली. रॅलीत ना. उदय सामंत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, प्रमोद शेरे, तालुका युवाधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकारी अभिजित दुडये, संजू साळवी, विकास पाटील यांच्यासह शेकडो युवासैनिक आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. मारुती मंदिर येथून ही सायकल रॅली जयस्तंभपर्यत काढली. पेट्रोल, डिझेल १०० पार, हेच का अच्छे दिन मोदी सरकारचे असे फलक या रॅलीमध्ये लावले होते. इंधनाच्या वाढत्या दरामुळे त्रस्त नागरिकांना बैलगाडीने प्रवास करावा लागेल, असा संदेश देण्यासाठी रॅलीमध्ये बैलगाडी ठेवली होती. यामध्ये सहभागी झालेल्या ना. सामंत यांनी सायकल सवारी करत केंद्राच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात रॅली काढण्यात येत आहे. रत्नागिरीतील शेकडो त्रस्त नागरिक यामध्ये सहभागी झाले आहेत. सध्या इंधनाचे वाढते दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काहीतरी केले पाहीजे याची आठवण या निमित्ताने करुन दिली जात आहे. घरगुती गॅसचाही दर हजारापर्यंत गेल्याने सामान्य नागरिकांची आर्थिक घडी कोलमडली आहे. रॅली यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी तालुका युवाअधिकारी तुषार साळवी, शहर युवाधिकार अभिजित दुडये यांच्यासह केतन शेट्ये, देवदत्त पेंडसे, आशिष भालेकर, प्रथमेश साळवी यांनी नियोजन केले होते.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here