मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवासी, पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एलटीटी ते थिविम आणि पनवेल ते थिविम दरम्यान स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ०१२५७ विशेष ट्रेन एलटीटी येथून ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ५वाजून ३३ मिनिटांनी सुटून थिविमला त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासाकरिता ०१२५८ विशेष ट्रेन थिविमहून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून एलटीटील दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी येणार आहे. या ट्रेनल ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रोड, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकात थांबा दिला आहे. याशिवाय ०१२५९ विशेष ट्रेन पनवेलहून ४ नोव्हेंबर रोजी सकाळी वाजून १५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी ४ वाजून ५० मिनिटांनी थिविमला पोहोचणार आहे. ०१२६० ट्रेन थिविम ट्रेन ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून पनवेलला दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.या ट्रेनला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग रोड, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकात थांबा दिला आहे. या दोन्ही गाड्यांना सेकण्ड क्लास सिटिंगचे २० कोच आहेत. या गाडयांचे आरक्षण प्रवासी ३१ ऑक्टोबरपासून करु शकतात.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 01-Nov-21
