इंधन दरवाढीविरोधात राजापूर शिवसेनेची सायकल फेरी

0

रत्नागिरी : पेट्रोल-डिझेलची अवास्तव दरवाढ हेच का अच्छे दिन? असा सवाल उपस्थित करीत शिवसैनिक आणि युवा शिवसैनिकांनी रविवारी राजापूर येथे सायकल रॅली काढून केंद्र शासनाचा निषेध केला. आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत जवाहर चौक परिसर दणाणून सोडला. राजापूर शिवसेना कार्यालय ते जवाहर चौक या दरम्यान काढण्यात आलेल्या या सायकल फेरीमध्ये आमदार साळवींसह शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, युवा सेनेचे जिल्हा युवाधिकारी विनय गांगण, उपयुवाधिकारी संतोष हातणकर, तालुका युवा अधिकारी प्रफुल्ल लांजेकर, शहरप्रमुख संजय पवार, उपजिल्हा महिला आघाडीप्रमुख दूर्वा तावडे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती भारती सरवणकर, पंचायत समितीच्या सभापती करुणा कदम यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, तालुका शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते. करोना महामारीमध्ये सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या बेजार झालेली असताना गेल्या काही दिवसांपासून वाढत गेलेल्या इंधन दरवाढीने आणखीच मेटाकुटीस आली आहे. या दरवाढीविरोधात सर्वामामान्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वसानान्यांच्या या आक्रोशाला शिवसेनेने रविवारी सायकल फेरी काढून वाचा फोडली. जवाहर चौकामध्ये मार्गदर्शन करताना आमदार साळवी यांनी सांगितले की, सायकल फेरीच्या माध्यमातून केलेल्या आक्रोशाचा केंद्र शासनाने विचार करून दरवाढ कमी करावी. युवा सेनेचे जिल्हा युवाधिकारी श्री. गांगण यांनीही मार्गदर्शन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here