कोकण पाटबंधारे मंडळातील निवृत्त प्रशासकीय कर्मचारी प्रकाश नलावडे यांचे निधन

0

रत्नागिरी : खेडशी येथील ज्येष्ठ नागरिक आणि कोकण पाटबंधारे मंडळातील निवृत्त कर्मचारी प्रकाश नलावडे (वय ६३) यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकाश नलावडे यांनी कोकण पाटबंधारे मंडळात दीर्घकाळ वाहनचालक म्हणून सेवा बजावली. वाहनचालकांच्या संघटनेचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच विविध शासकीय कर्मचारी संघटनांचेही ते सदस्य होते. मराठा मंडळासह अन्य काही संघटनांशी त्यांचा संबंध होता. सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने २०११ मध्ये श्रीनगर मित्र मंडळ स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मंडळाचे ते सल्लागार होते. स्थानिक भजन मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये ते पखवाज वादन करत असत.

HTML tutorial

त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, पुत्र, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:58 AM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here