चिपळूण : महविकास आघाडीच्या अठरा नगरसेवकांनी चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून झालेल्या १९ विकासकामांत अनिनियमितता व गैरव्यवहार झाल्याची तक्रार करून नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे या कामात अनियमितता झाल्याचा अहवाल राज्य शासनाला दिला आहे. महाविकास आघाडीच्या या मागणीची व जिल्हाधिकारी यांच्या चौकशी अहवालाची राज्य शासनाने आता गंभीर दखल घेतली आहे. नगराध्यक्षा खेराडे यांना कारणे दाखवा नोटीस देऊन या नोटिसीला उत्तर देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नगराध्यक्षांवरील कारवाई एकतर्फी होऊ नये, यासाठी ही नोटीस देण्यात आली असून २७ ऑक्टोबर रोजी याबाबत पत्र अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी दिले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:16 PM 01-Nov-21
