रत्नागिरी : सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असणा-या स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेतर्फे रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमध्ये काम करणा-या १८ आशा सेविकांना प्रत्येकी रु.१०००/- ची दिवाळी भेट काल संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचे हस्ते प्रदान करण्यात आली. रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील कोकणनगर व झाडगाव आरोगय उपकेंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या आशासेविकांना ही मदत देण्यात आली. या आरोग्य उपकेंद्रांतर्गत कोविड काळात अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये या आशासेविकांना विविध कामे केली आहेत. या कामाचा त्यांना अत्यंत तुटपुंजा मोबदला दीला जातो यामुळे या आशा सेविकांनी त्यांना काही आर्थिक मदत करावी असे निवेदन संस्थेला दिले होते. त्यावर त्वरीत निर्णय करीत कोविड योद्धा असलेल्या या आशा सेविकांना मदत करीत त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेने त्यांना ही मदत केली व त्यांनी समाजाप्रती केलेल्या कामाचा आदर केला असे उदगार या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी काढले. या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. सचिन करमरकर, माजी नगरसेविका संपदा तळेकर व जिल्हा चिटणीस पल्लवी पाटील उपस्थित होत्या.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:27 PM 01-Nov-21
