दापोली : तालुक्यातील कुडावळे येथे दापोली-ठाणे ही बस व सेलेरिओ कारध्ये २९ रोजी ४.४५ वा. च्या सुमारास झालेल्या अपघातानंतर बस चालकाला गाडीतील टॉमी व हाताने मारहाण केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार हेमंत सूर्यवंशी (३१, रा. निमदाळे तालुका जिल्हा धुळे हे ठाणे आगारात कार्यरत आहेत. दि. २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४:४५ च्या सुमारास आपल्या ताब्यातील बस घेऊन दापोलीहून ठाण्याकडे निघाले होते. त्यांची बस मौजे टांगर फाट्याच्या पुढे १ किलोमीटर अंतरावर कुडावळे येथील चढाजवळ आली असता मंडणगडकडून दापोलीकडे येणारी सेलेरिओ कार एसटीच्या उजव्या बाजूला धडक देऊन धडकली, असे हेमंत सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. अपघातानंतर गाडीतील भालचंद्र सुतार (३३) याने बस चालकाला खाली ओढून बसमधील टॉमीने चालकाच्या हातावर मारून दुखापत केली. तसेच बस ची काच फोडून गाडीचे नुकसान केले. याचवेळी रमेश रणपिसे (५०), ऋषिकेश उर्फ अतुल रणपिसे (३२), अनिल मोरे (५०), संदीप माने (३२), सर्व रा. पाषाण, सुतारवाडी, पुणे यांनी चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केले व गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:22 PM 01-Nov-21
