चिपळूण : विश्व हिंदू परिषद चिपळूण तालुक्याच्या माध्यमातून सोमवारी (दि.१) जुना कालभैरव मंदिराच्या पटांगणावर सायंकाळी ५ ते ६ या वेळेत गोमाता पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून आश्विन वद्य द्वितीया म्हणजेच वसुबारस या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन विहिंप तालुका प्रखंडच्या माध्यमातून केले आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन किशोर कडवेकर, साईनाथ कपडेकर, शशिकांत वहाळकर यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:32 PM 01-Nov-21