14 व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर; तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

0

खेड : तालुक्यातील अस्तान गावात ग्रामसेवक म्हणून काम करताना सरपंचांसोबत संगनमत करून सन २०१७-२०१८ व सन २०१९-२०२० या कालावधीत लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात दि. २९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील अस्तान ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शशिकांत शंकर जाधव व दीपक जगन्नाथ मोरे (रा. सवणस) हे अस्तान ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करीत असताना हा प्रकार घडला. सन २०१७-२०१८ व सन२०१९-२०२० त्यांनी एकमेकांच्या संगनमताने व साहाय्याने चौदाव्या वित्त आयोगाची मंजूर रक्कम व ग्रामनिधीची रक्कम मिळून रक्कम ८ लाख २४ हजार ७३० रुपये रकमेच्या कामामध्ये अनियमितता केली. ही रक्कम स्वत:च्या नावे काढून अपहार केला आहे. या प्रकरणी पंचायत समिती विस्तार अधिकारी शरद साहेबराव भांड (वय ५३, रा. भरणे, खेड) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हिंगे करीत आहेत.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:53 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here