कोयना अवजल उत्तरेकडे वळवून अर्थप्राप्ती शक्य; वैशाली नारकर यांचे प्रतिपादन

0

रत्नागिरी : कोयना अवजलातील 67.50 टीएमसी पाण्यापैकी पन्नास टीएमसी पाणी उत्तरेकडील खोर्‍यात वळवले तर त्यामधून रत्नागिरी जिल्ह्याला 42.91 कोटी रुपये उपकरापोटी मिळतील. या निधीतील चाळीस टक्के वाटा हा अवजलातील 17.5 टीएमसी पाणी जिल्ह्यात वापरासाठी राबविण्यात येणार्‍या छोट्या प्रकल्पांवर खर्च करता येऊ शकतो. त्यादृष्टीने विचार करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पाटबंधारे महामंडळाच्या अभियंता वैशाली नारकर यांनी केले. रत्नागिरीत आयोजित जलपरिषदेच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना त्या बालत होत्या. श्रीमती नारकर म्हणाल्या की, कोयनेचे अवजल टनेलद्वारे समद्रात सोडा, अशी मागणी होत आहे; परंतु तसे करण्यापेक्षा अवलजाचे आर्थिक सपत्तीत रुपांतरीत केल्यास रत्नागिरी जिल्ह्याला फायदा होईल. सगळे पाणी कोकणासाठी वापरावे ही मागणी व्यवहार्य नाही. या पाण्यावर उपसा सिंचन योजना राबविल्यास त्या खर्चिक ठरु शकतात. वाशिष्टीचे पाणी छत्तीसगावातील क्षेत्राला वापरण्यात येणार होते. पण तो प्रकल्प खर्चिक असल्यामुळे मागे पडला. सध्या कोकणाचा जल आराखडा तयार झाला आहे. त्यात 67.50 टीएमसी पाणी हे वापरात आणण्यासाठीचा अभ्यास केला जात आहे. एकुण पाण्यापैकी 50 टीएमसी पाणी उत्तरेकडे किंवा मुंबईला तर 17.5 टीएमसी पाणी शास्त्री, मुचकुंदी, कोदवली खोर्‍यात वापरण्याचा उहापोह होणार आहे. कोयना अवजलातील फुकटचे पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. एकुण पाण्यापैकी 17.5 टीएमसी पाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला वापरले तर ते अधिक फायदेशीर ठरु शकते. उपलब्ध होत असलेल्या एकुण पाण्यापैकी पन्नास टीएमसी पाणी मुंबईकडे वळवायला मान्यता दिली, तर आताच्या दरानूसार 42.91 कोटी रुपये दरवर्षी मिळतील. त्यातील उपकर वीस टक्के रक्कम म्हणजेच साडेसात कोटी रुपये सेस म्हणून जिल्हा परिषदेकडे वर्ग होतील. उर्वरित रकमपैकी 60 टक्के शासन आणि 40 टक्के धरण दुरुस्तीसह विविध प्रकल्पांसाठी कोकण पाटबंधारे महामंडळाला उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे पन्नास टीएमसी पाणी ग्राहकाला दिले तर त्यातून उपकर मिळणार आहे. हा पैसा उपलब्ध झाला तर छोट्या छोट्या उपसा सिंचन योजना करुन लांजा, राजापूरपर्यंत सिंचनासाठी पाणी नेणे शक्य होतील. त्यामुळे काहीही न खर्च करता एमआयडीसी, सिडको आणि उद्योजक यांच्या ग्रुपने पाणी योजना राबविण्याचं ठरवलं तर त्यामधून आपसूकच उत्पन्न मिळू शकते. सीडकोमार्फत कोयना अवजल नेण्याचा विचार सुरु होता, मात्र तो खर्चिक असल्यामुळे ते शक्य झाले नाही. त्यासाठी विविध ग्रुप एकत्रितपणे येऊन अवजल वापरासाठीची योजना राबवल्यास ते फायदेशीर आणि व्यवहार्य ठरु शकेल.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here