‘कंत्राटी रुग्णवााहिका चालकांचा शासन सेवेत समावेश करावा’

0

वरवेली : रत्नागिरी जि. प. आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिका चालक म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कायम स्वरुपी शासन सेवेत समावेश करावा, या मागणीसाठी ना. उदय सामंत यांना निवेदन दिले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी वेळेवर मानधन मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच आम्हाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १०२ रुग्णवाहिकेवर ६७ कंत्राटी वाहनचालक गेली १७ वर्षे २४ तास विनाअपघात सेवा देत आहेत. कोरोना आपत्तीत कठीण काळात रात्रंदिवस सेवा देऊन त्यांनी आपले कर्तव्य बजावले. गरोदर माता, नवजात बालके, कोरोना पॉझिटिव्ह व इतर अत्यावश्यक रुग्णांना रुग्णालयात सोडण्यात व गावोगावी जाऊन रुग्णांना अँटिजेन तपासणी करण्यासाठी कोव्हिड १९ लसीकरण करण्यासाठी सेवा दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही आरोग्य सेवा देतानाच अल्प मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आमची वयोमर्यादा ओलांडून गेली असल्याने दुसरीकडे नोकरी करण्याचा प्रयत्न करता येत नाही. भविष्यात वाहनचालकांची भरती निघाल्यास १७ वर्षीय सेवेचा विचार करुन आम्हाला सेवेत कायम करावे, अशी विनंती निवेदनात केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:31 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here